महाड : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ही महामारी शहरापुरती मर्यादित न राहता आता गावातही झपाट्याने पसरत आहे. महाविकास आघाडी सरकारची कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे अश्या अपुऱ्या व्यवस्थेत लोकांनी कसे जगायचे.असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
महाडमधील एम.आय.डी.सी. येथील एम.एम.ए.डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट दिली व तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तेथील वैदयकीय कर्मचा-यांशी चर्चा केली. महाडमधील आरोग्य स्थितीचा आढावा दरेकर यांनी घेतला. यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारच्या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले. गेल्या महिन्याभरात कोविडच्याबाबतीत रायगड जिल्ह्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. कोरोना रोखण्यासाठी ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाने व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता होती ती दिसून येत नाही आहे. अपुऱ्या व्यवस्थेमुळे लोक आज मरण पावत आहेत. केवळ घोषणा देऊन चालत नाही तर व्यवस्थेकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे असते, अशी टीकाही त्यांना केली.
रायगडमधील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलताना दरेकर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी रुग्णाची संख्या सुमारे ३८०० होती आणि मृत्यूचा आकडाही ६९७ होता. पण १० दिवसातच हा आकडा वाढून सुमारे ३८ हजारापर्यंत गेला. कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. आज परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की दिवसाला ४६७ रूग्ण याठिकाणी आढळत आहेत. अपुरी आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार आहे. राज्य शासनाला याप्रकरणी उपाययोजना करण्यासाठी वारंवार पत्र देऊन सुध्दा दखल घेतली जात नाही हे दुर्देवी आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
महाड येथील कोविड रुग्णालय उभारण्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. महाड येथे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांकडून जे आवश्यक सहकार्य लागेल ते सर्व करण्याचे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.
मराठा आरक्षणाच्या विषयाला विरोधी पक्षांकडून खतपाणी घालण्याचा राज्य सरकारचे आरोप दरेकर यांनी फेटाळून लावले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यात आलेले होते, पण ३०-३५ वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सरकारला न्यायालयात हे आरक्षण टिकवता आलेले नाही. केवळ आपला हलगर्जीपणा लपविण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर खापर फोडण्याचे काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण राज्याची जनता ही सुज्ञ आहे. भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आग्रहपूर्वक पूर्णपणे प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांनी आज महाड मधील एम.आय.डी.सी. एम.एम.ए.डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट दिली. यावेळी रायगडचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते सरचिटणीस बिपिन महामुंकर, एमएमए कोविड सेंटरचे अध्यक्ष पाठारे, डॉ.पाटील, महाड तालुका प्रमुख जयवंत दळवी,पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, भाजप युवा मोर्चाचे रायगड अध्यक्ष अमित घाग जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…
- सुधारित कृषी विधेयकाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोंदवला निषेध
- विराट कोहलीला डब्बल दणका मॅचही हरली आणि…
- धक्कादायक : पुणे संकटात असताना महापौर बंगल्यावर रंगली सर्वपक्षीय नेत्यांची जंगी पार्टी ?
- महापालिका हद्दीतून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम रस्त्यासाठी आ.जगताप यांचे पवार यांना साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

