Share

भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत – विनोद तावडे

Published On: 

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता न येऊ शकल्याबद्दल त्यांनी फडणवीसांना दोष दिला होता. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळं राज्यात भाजपचं सरकार आलं नाही की काय, याचा शोध घेत असल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्यानं त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाष्य केल आहे.

एकनाथ खडसे हे नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ‘भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत हा ठाम विश्वास मला आहे,’ असं तावडे म्हणाले आहेत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!