Share

एन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून शिक्कमोर्तब

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंबंधी राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयातून नोटीस जारी करण्यात आली आहे. २४ एप्रिलला रमना आपल्या पदाची शपथ घेतील.

त्यामुळे आता 18 नोव्हेंबर 2018 साली शरद अरविंद बोबडे हे देशाचे 47 वे सरन्यायाधीश होते तर रमना हे 48 वे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. नथालपती वेंकट रमन्ना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ला आंध्र प्रदेशच्या पोन्नवरम गावात झाला होता. त्यांचे आई-वडील शेती करत. त्यांनी विज्ञान आणि विधी विषयांमध्ये पदवी घेतली आहे. आपल्या कुटुंबातील ते पहिलेच वकील आहेत.विविध विषयांमध्ये अनुभव..१० फेब्रुवारी १९८३ला त्यांना वकिलीची मानद मिळाली. यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरण, आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम केले.

त्याच बरोबर त्यांनी परदेशात देखील न्याय व्यवस्थेचा अभ्यास केले आहे. युनायटेड किंगडमने त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी ग्रेट ब्रिटनचा दौराही केला. यावेळी त्यांनी ब्रिटनमधील न्यायव्यवस्थेचा अभ्यास केला. तसेच, अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचाही दौरा केला आहे. १८ जून २०१९ला रशियामध्ये झालेल्या शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्या देशांसाठी आयोजित मुख्य न्यायाधिशांच्या परिषदेलाही ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!