Share

तत्वशीलनगरमधिल ‘त्या’ चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ कायम!

Published On: 

औरंगाबाद : वीज कडाडताच घरात खेळणारी सहा वर्षीय चिमुकली बेशुद्ध पडली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केल्यावर उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. जिन्सीतील जुना मोंढा भागातील तत्वशीलनगरमध्ये ही घटना घडली. चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल राखीव असल्यामुळे मृत्यूचे गूढ कायम आहे.

आक्सा इस्माईल शेख (६, रा. तत्वशीलनगर, जुना मोंढा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास मुसळधार पाऊस बरसला. तेव्हा आक्सा ही घरातच खेळत होती.

आकाशात विजांचा कडकडाट होताच आक्सा प्रचंड घाबरली. आवाजाने ती घरातच बेशुद्ध पडली पण नेमके काय झाले ?, असे समजून आई-वडिलांनी तिला तात्काळ घाटीत दाखल केले. उपचारादरम्यान मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पानखडे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!