🕒 1 min read
मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात आहे. मात्र या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घटनेसंबंधी संशयास्पद कट असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं होत.
अशातच, जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. हा मृत्यू या प्रकरणात अधिक गूढ निर्माण करणारा असून जेव्हा त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी जीव देत नाही,’ असं सांगत केंद्रीय तपास यंत्रणांकडे हे प्रकरण सोपवावे अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.
नसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आता या प्रकरणाचा तपास (NIA) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी केली आहे.
अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा, मनसुख हिरे यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत संशयास्पद स्थितीत सापडला. या महत्त्वाचा दुवा नाहीसा करण्यात आल्याचा संशय येत आहे… अत्यंत संवेदनशील असे हे प्रकरण राज्य सरकारने NIA कडे सोपवावे अशी मागणी करतो… pic.twitter.com/EIH5CQX1Rh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 5, 2021
‘अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा, मनसुख हिरे यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत संशयास्पद स्थितीत सापडला. या महत्त्वाचा दुवा नाहीसा करण्यात आल्याचा संशय येत आहे… अत्यंत संवेदनशील असे हे प्रकरण राज्य सरकारने NIA कडे सोपवावे अशी मागणी करतो…’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ही खेळी पहिल्यांदा नाही अन् अखेरचीही; सौरव गांगुलीने थोपटली पंतची पाठ
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार : बावनकुळे
- मनसुख हिरेन हे तर पट्टीचे स्वीमर,मग ते तलावात जीवन कसे संपवू शकतात?
- कोरोना म्हणजे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत; राऊतांनी राज ठाकरेंना सुनावलं
- ‘मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राची जबाबदारी नाकारून भाजपने दिशाभूल करू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
