Share

मनसुख हिरेन हे तर पट्टीचे स्वीमर,मग ते तलावात जीवन कसे संपवू शकतात?

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे.

या सर्व प्रकरणावर ठाणे पोलीस उपायुक्तांनी मोठी माहिती दिलेली आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे. अपघाती मृत्यू असा अहवाल (एडीआर) नोंदविला गेला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

परंतु, ‘मनसुख हिरेन हे आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाहीत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांना कुठलाही तणाव नव्हता. ते चांगले स्विमर होते ते पाण्यात आत्महत्या करू शकत नाहीत,’ असा दावा मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी केला.

मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळला आहे. इतकंच नाही तर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार “यामागे नक्कीच घातपात आहे. त्यांची हत्या झाली असावी हा आमचा आरोप आहे. त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वर्गात शिकतात, जवळच्या सोसायटीत राहत असल्याने वारंवार भेट व्हायची. अंबानी स्फोटके प्रकरणात गाडी वापरल्यामुळे त्यांची मी विचारपूस केली होती. तर त्यांच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून ते दबावात नव्हते हे स्पष्ट होतं. आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात एक निष्पाप बळी गेलाय” असे मत त्यांच्या निकटवर्तीयांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!