Share

कोरोना म्हणजे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत; राऊतांनी राज ठाकरेंना सुनावलं

Published On: 

मुंबई : राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या काळात मास्क वापरत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मराठी भाषा दिनी मनसेच्या एका कार्यक्रमाला देखील ते विनामास्क हजर राहिले होते.

इतकच काय, विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला ते गेले होते. मात्र, विधानभवनात प्रवेशासाठी मास्कसह RTPCR कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचे समजताच ते उद्धव ठाकरेंची भेट न घेताच परतले होते. यामुळे त्यांना मास्क घालण्याबाबत विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

तर, नाशिक दौऱ्यात देखील राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता. तर, त्यांच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक पोहोचले असता, यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना मास्क काढा अशा सूचना केल्या. यावरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

‘कोरोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,’ असं विधान संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.

अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही, पण…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. ‘काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?’ अस म्हणत अजित पवारांनी नाव न घेता समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!