Share

“माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा…” आठवलेंचा हटके उखाणा

Published On: 

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो म्हणून ‘होम मिनिस्टर’ गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात दिवाळी विशेष भाग सुरु आहे. याच विशेष भागात महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्त्व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या सौ. हजेरी लावणार आहे.

नुकतंच  ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातील दिवाळी विशेष भागाचा झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत रवी जाधव आणि त्यांच्या पत्नी पाहायला मिळत आहे. येत्या आठवड्यातील या कार्यक्रमातील विशेष भागात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी हजेरी लावणार आहेत. रामदास आठवले व त्यांच्या पत्नी हे दोघेही या आठवड्यात खास पाहुणे असणार आहे. यावेळी आदेश बांदेकर हे आठवले कुटुंबासोबत आणि त्यांच्या ‘होम मिनिस्टर’सोबत गप्पा मारताना दिसणार आहेत. या प्रोमोत रामदास आठवले हे त्यांच्या शैलीत कविता करताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकरांनी आठवलेंना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली. त्यावेळी आठवलेंनी तारीख सांगतच एक मजेशीर उखाणा घेतला. “माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा”, असा हटके उखाणा रामदास आठवले यांनी घेतला. त्यांचा हा मजेशीर उखाणा ऐकून बांदेकर भावोजींनाही हसू आवरले नाही.

दरम्यान आठवले कुटुंबियांसोबत रंगलेला होम मिनिस्टरचा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी १२ आणि शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या दरम्यान कोणकोणत्या गमतीजमती होतात? आठवले त्यांच्या पत्नीला पैठणी मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!