पुणे : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे असा दावा महावितरणने केला आहे.
डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे.
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ‘कॉंग्रेसचा हात गरिबो के साथ…’ म्हणून मतांची भिक मागणारी कॉंग्रेस आज सत्तेवर आल्यानंतर सर्व सामान्य लोकांच्या खिशावर दरोडे टाकत आहे. टाळेबंदी काळात संपूर्ण जनता अडचणीत असताना व खोटी विज बीले आलेली असताना जर उर्जामंत्री मा. नितीन राऊत यांना लोकांचे दुःख दिसत नसतील तर… सत्तेची मस्ती लोक जिरवल्याशिवाय राहाणार नाहीत. ऊर्जामंत्री नितीन राऊत स्वतःच्या शब्दां विरोधात फितुरी करत आहेत. महाराष्ट्र सरकार व महा वीज वितरण कंपनीकडून सर्व सामान्य माणसाच्या खिशावर ‘दरोडा’ टाकण्याचा व सामान्य माणसाला दहशतीत ठेवण्याचा हा प्रकार आहे… असे मत संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपवाले भविष्यात देशाचा हिंदुस्थान ऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील; राष्ट्रवादीची टीका
- लातूर मनपाकडून व्याजावर 100 टक्के सुट
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- मोहम्मद सिराजचे धमाकेदार प्रदर्शन अन् ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे ‘थोबाड’ कायमचे बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
