औरंगाबाद : महापालिकेने राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उन्हाळ्यापासून खाम नदी पात्राची स्वच्छता केली जात असून, आत्तापर्यंत शेकडो टन प्लास्टिक कचरा उचलण्यात आला आहे. पुन्हा नदीपात्रात प्लास्टिक कचरा येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण, काठांवर वृक्षलागवड आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा झालेल्या जोरदार पावसाने खाम नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही धोका राहिलाच नाही. त्याच बरोबर पुन्हा एकदा नदीपात्रात खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज घुमला. या मोहिमेमुळेच हा चमत्कार झाल्याचे बोलले जात आहे.
याविषयी मनपा आयुक्त म्हणाले, यावर्षी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत खामनदी पुनर्जीवन मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पात्र खोल करणे, त्याची साफसफाई करणे, नदीचा प्रवाह सुरळीत करणे तसेच नदी काठावरील अतिक्रमण काढणे आणि खाम नदीवरच्या पुलावरून लोकांनी नदीत कचरा किंवा मलबा टाकू नये यासाठी नाल्याच्या भिंतीवर दोन्ही बाजूला संरक्षित जाळ्या बसविण्यात आल्याने नदी काठावरील आणि नदी जवळील सखल भागात पाणी शिरण्याचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे.
तसेच यावर्षी शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची सफाई देखील चांगल्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे खाम नदीकिनारी पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान कमी होत आहे. पुढील वर्षी अजून चांगल्या पद्धतीने नाल्यांची सफाई करण्यात येईल जेणे करून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. असेही ते म्हणाले. सद्यस्थितीत जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी व खाम नदी काठावरील इतर वसाहती येथील खाम नदी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. उपाय योजना म्हणून या सर्व ठिकाणी महानगर पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत. तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
