Share

“राष्ट्रवादीच्या गॅसवरील मटण-करी, चड्डीत राहायचं” ; मनसेचा जोरदार पलटवार

Published On: 

मुंबई : भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा आणि त्यानंतर झालेल्या उत्तरसभेनंतर राज्यात भोंग्यांच्या मुद्दा पेटला होता. यावरूनच राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला होता. आत्ता मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अमोल मिटकरी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देशपांडे हे ट्विट करत म्हणाले की, “राष्ट्रवादी च्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं”. असा जोरदार हल्ला देशपांडे यांनी चढवला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या सभेदरम्यान अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली. या सभेत त्यांनी हनुमान चालीसा ही म्हणून दाखवले. या सभेतच त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला होता.

आता अमोल मिटकरी यांचा उल्लेख मटण करी झाल्याने आणि चड्डीत राहायचं असं दम मिळाल्याने,
अमोल मिटकरी काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!