Share

“…शिक्षा झालीच पाहिजे”; ब्राह्मण महासंघाकडूनही केतकी चितळेवर आक्षेप!

Published On: 

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे. यामुळे आता ती प्रचंड ट्रोल होत आहे. आता शरद पवारांवर केलेल्या टीकेवरती ब्राह्मण महासंघाकडूनही केतकी चितळेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाचं समर्थन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी बरोबरच आमचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि आम्ही भविष्यात सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांची लढत राहू, असं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं म्हंटले आहे. पण कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासत्मक लिहिणं त्यांच्या मरणाची वाट पाहणे ही विकृतीच आहे, अशीही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या आजाराला शिक्षा झालीच पाहिजे, असं सांगत आनंद दवेंची केतकी चितळेवर टीका केली आहे. शरद पवारांवर टीकेवरती ब्राह्मण महासंघाकडूनही केतकी चितळेबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट –

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक ll

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!