Share

“महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक…”; केतकी चितळेच्या पोस्टवर संजय राऊतांची टीका

Published On: 

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. फेसबुकवर हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. यावरून तिला भरपूर ट्रोलही केले जात होते. पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे. आता या पोस्टवरून संजय राऊत यांनी केतकी चितळेवर टीका केली आहे.

केतकी चितळे विरोधात वादग्रस्त पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खरमरीत शब्दांत टीका केली. “अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. हे नशेबाज लोक आहेत सगळे, यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, असे संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कुणी थुंकलं किवा हिमालयाला कुणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की ते हवेबरोबर उडून जातील”, असेही संजय राऊत म्हणाले.

केतकी चितळेची फेसबुक पोस्ट कोणती?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!