Share

“काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसले”; जयंत पाटलांचा आरोप

Published On: 

मुंबई : जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘काँग्रेस’च्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येत असताना पाहायला मिळत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे.

“राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तसेच या बाबत दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर या सर्व गोष्टी घालण्यात आल्या आहेत, मात्र यात कोणताही बदल स्थानिक पातळीवर झाला नाही. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे”.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकांवरही वक्तव्य केली. “राज ठाकरे यांनी भूमिका बदलतात,काही कालांतराने त्याला वेगवेगळ्या बाह्य कारणे असतात, पण ते भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे जे करतात ते लोक फारसे गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होते, कारण ते चांगल्या पद्धतीचे नकला करतात, ते बघायला गर्दी होते. पण लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत, त्यामुळे राज ठाकरेंनी देखील आता आत्मचिंतन करावे”, असे जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या  बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!