🕒 1 min read
नवी-दिल्ली : मागील काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये चांगला गोंधळ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अचानक राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. तसेच आता सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, सिंह म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचे जे धोरण राहिले आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखे वाटते असेही म्हंटले होते. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Too much being read into Cap Amarinder Singh's visit to Delhi. He’s on a personal visit, during which he’ll meet some friends & also vacate Kapurthala house for the new CM. No need for any unnecessary speculation: Raveen Thukral, Media Advisor to Capt Amarinder Singh
(File pic) pic.twitter.com/NHl3ZLNFM6
— ANI (@ANI) September 28, 2021
दरम्यान, या संदर्भात बोलतांना कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल म्हणाले आहेत की, ‘कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल अनेक बातम्या येत आहे, परंतु ते दिल्लीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत, तिथे ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार आहेत. तसेच नवीन मुख्यमंत्र्यांसाठीचे कपूरथलाचे घरही ते रिकामे करणार आहेत. त्यामुळे अशा शक्यता वर्तवणं चुकीचे’ असल्याचेही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
