औरंगाबाद : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे काेराेना प्रतिबंधक लसीकरणाच्या माेहिमेला वेग देण्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत आहे. साेमवारपासून (दि.५) ११५ वाॅर्डांमध्ये ११५ बूथ सज्ज ठेवून जम्बाे माेहीम राबवण्याची तयारी मनपाने केली आहे. शासनाकडून औरंगाबाद महापालिकेस आणखी १ लाख लसींचा साठा रविवारी उपलब्ध झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी लसींचा साठा वेळेवर न पोहचू शकल्याने नागरिक आल्यापावली परत फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार पालिकेने जम्बो लसीकरण मोहिमेची तयारी केली आहे. शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास सुरूवात आली आहे.
शहरात आजवर ३७ केंद्रांवरून ९२ हजार ५०४ नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली आहे. जम्बो मोहिमेअंतर्गत ३ लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून शहरात ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चारच दिवसांत सुमारे ५० हजार नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे.
माजी आणि भावी नगरसेवकांचा पुढाकार
शहरातील एकुण ११५ वॉर्डांमध्ये आजपासून लसीकरणाचा सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी समाज मंदिरे, मनपाचे सभागृह, मैदाने याठिकाणी मंडप टाकून लसीकरण केले जात आहे. यात नागरिकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहचवणे, जनजागृती करणे इत्यादी कामे मनपाच्या कर्मचारी वर्गाबरोबरच त्या त्या वॉर्डातील माजी नगरसेवक, तसेच येणाऱ्या निवडणूकीतील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने जनजागृती करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

