Share

देशासह राज्यातील सर्व महापालिकांनी मुंबईचा आदर्श घ्यावा : उच्च न्यायालय

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षाच्या अखेरीस देशातील जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातले असून देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला असून आता मुंबई उच्च न्यायालयाने देशासह राज्यातील इतर महापालिकांनी मुंबई महापालिकेचा आदर्श घ्यावा, असं नमूद केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज कोरोना संबंधित याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. मात्र गंभीर स्थिती असलेल्या पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करावा, असं उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.

यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना स्थितीची दखल घेत मुंबई महापालिकेच्या कौतुकाचा देखील उल्लेख करत मुंबई महापालिकेची पाठ थोपटली आहे. ‘मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानही दिला ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र मुंबईचा आदर्श जर देशासाठी असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा. राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही याची काळजी,’ असा सल्ला देखील उच्च न्यायालयाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!