Share

‘‘कोरोनाने आपली विकेट घेऊ..” म्हणत Mumbai पोलिसांचं ट्विट व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra Government) देखील कोरोना संसर्गात वाढ होत असून कोरोनाच्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीसह अनेकजणांना कोरोनाची लागण झाली. नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याच सांगत याबद्दल मुंबई पोलिसांनी (Mumbai Police tweet) सोशल मीडियावर एक आवाहनपर पोस्ट शेअर केले असून प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई पोलीस सोशल मीडियात नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन नागरिकांना सतर्क करणारे, आवाहन करणारे किंवा सल्ला देणारे मीम्स पोस्ट करण्यात येत असतात. नुकतच मुंबई पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आलं असून त्याद्वारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागिरकांना करण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Corona virus) होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) काही निर्बंध सुद्धा लावण्यात आली आहेत.

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रसासनाकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा होत असून, कोरोनाने आपली ‘विकेट’ घेऊ नये असे वाटत असेल तर मास्क नामक ‘हेल्मेटच’ ठरू शकेल आपली सर्वोत्तम रणनीती, मास्क वापरा, लसीकरण करा आणि कोरोनाचे नियम पाळा या आशयाचं हे ट्विट सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून पसंती दर्शवित आहेत.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1480576286359654402?s=20

दरम्यान राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू (Restrictions imposed in Maharashtra) केले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री १० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बंदी, कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी, कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे,कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत, लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमास कमाल ५० व्यक्तींना परवानगी अशी नियमावली करण्यात आली असून हे निर्बंध आणि नियम १० जानेवारी२०२२ च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!