Share

“राजनाथ सिंहजी कोरोनातून लवकर बरे व्हा”, मुनगंटीवारांनी केली प्रार्थना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नड्डा आणि राजनाथ सिंह बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. नड्डा आणि राजनाथ सिंह यांनी ट्विट करत कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसेच जेपी नड्डा म्हणाले, सुरुवातीला कोरोनाचे लक्षण दिसून आल्याने मी कोविड चाचणी केली. त्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आता माझी प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांच्या सुचनेनुसार मी स्वता:ला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. असे जेपी नड्डा म्हणाले आहेत.

भाजपा अध्‍यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि केंद्रीय मंत्री अजय भट्ट हे सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने मी चाचणी केली आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!