🕒 1 min read
मुंबई: राज्यात १ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अजूनही २ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणाबाबत निर्णय झालेला नाहीये. मात्र आता मुंबई महापालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ (Blue Print) तयार केली आहे.
मुंबईतील एकूण २५० केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी (Childrens Vaccination) सुविधा असणार आहे. तर लसींचा साठा करण्यासाठी पालिकेकडे कांजूरमार्ग इतर ठिकाणी शीतगृह व्यवस्था करण्यात आली आहे. १८ वर्षाखाली तब्बल ३५ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान या ब्लू प्रिंटनुसार लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आयसीएमआरची लसीकरणाला परवानगी मिळाल्यास तीन दिवस ते आठवड्याच्या आत लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुंबई पालिकेने म्हटले आहे. पहिला डोस त्यानंतर २८ व्या दिवशी दुसरा डोस आणि ५६ व्या तिसरा डोस असे तीन डोस मुलांना देण्यात येणार आहेत.तसेच लसीकरणानंतर खबरादीर म्हणून संबंधित बालकाला अर्धा तास वैद्यकीत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्या येणार आहे. तर लसीकरण बेग वाढवा यासाठी महापालिकेच्या वतीने जगजागृतीही करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकार दोन पाऊल पुढं आलं असतं तर तोडगा निघाला असता’
- “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करुन महाराष्ट्राला ‘नाईट क्लब’ बनवायचं का”
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
