मुंबई : मुंबईच्या प्रथम नागरिक व मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची आता काही वेळा पूर्वी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. तर काही भागांत दरड कोसळली आहे. मुंबईमध्ये 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती. त्यानंतर काहीच वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted due to chest pain in a hospital in the city, says BMC Mayor's Office
(File pic) pic.twitter.com/R5deDUThr1
— ANI (@ANI) July 18, 2021
त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सध्या मिळत आहे. किशोरी पेडणेकर या सर्वप्रथम २००२ साली नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली पुन्हा त्या नगरसेवक झाल्या. त्यांच्या निष्ठा आणि काम पाहून २०१७ साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना २०१७ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे’, यशोमती ठाकूर यांचे पांडुरंगाला साकडे !
- विठुरायाच्या पंढरीत कडक संचारबंदी लागू, बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही
- ‘एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक ; नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार’
- बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- कोरोनामुळे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर संथगतीने काम – जयदत्त क्षीरसागर


