मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजपने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
या सगळ्या प्रकरणावर शिवसेना नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिले आहे. ‘तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? अंगावर याल तर शिंगावर घेऊच’. असा थेट हल्लाबोल पेडणेकर यांनी केला आहे.
शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का ? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचंही उत्तर भाजपने द्यावं. असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सेनाभवनाकडे कुणी वाकड्या नजरेनं पहिले तर आम्ही गप्प बसणार नाही’
- मोदी सरकारचा मोठा निर्णय ; आरोग्य विभागासाठी देणार तब्बल ५०,००० कोटी
- नव्या परवाना शुल्काला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध, उपायुक्तांची घेतली भेट
- जायकवाडी येथील पंप हाऊस दुरुस्त, मात्र पाणीपुरवठ्यात चार तासांचा गॅप!
- धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, लवकरच कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश

