मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.
दुसर्या लाटेच्या या हाहाकारामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. या दरम्यान सरकारी सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती समोर आली आहे केंद्र सरकार महामारीमुळे त्रस्त असलेल्या आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी 6.8 बिलियन डॉलरचं (जवळपास 50,000 कोटी रुपये) कर्ज प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. सध्या अशी माहिती मिळत आहे की, ‘ ही प्रोत्साहन रक्कम कंपन्यांना हॉस्पिटलची क्षमता किंवा वैद्यकीय पुरवठा वाढविण्यात मदत करेल. यात सरकार एक गॅरंटर म्हणून काम करेल.
छोट्या शहरांमधील कोविड-19 संबंधितआरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. सध्या वित्त मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अलीकडील आरबीआय गव्हर्नर यांनी घोषणा केली होती की, कोरोना संकटाची गरज लक्षात घेता आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50000 कोटींचे कर्ज जाहीर केले जात आहे. त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दाट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, लवकरच कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश
- ‘जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवा’; अमेय खोपकरांचा सरकारवर निशाणा
- ‘माझ्या आजारपणाचा फायदा घेत काकांनी कट रचला’, चिराग पासवान यांचा आरोप
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?’


