Share

जायकवाडी येथील पंप हाऊस दुरुस्त, मात्र पाणीपुरवठ्यात चार तासांचा गॅप!

Published On: 

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यावरील संकटांची मालिका संपता संपेना. आत्तापर्यंत तीन ते चार वेळा पाईपलाईन फुटल्याने तर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच मंगळवारी सायंकाळी जायकवाडी येथील पंप हाऊस मध्ये ट्रिपिंग झाले होते. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. संध्याकाळी सुरु करण्यात आलेले काम ९ वाजेपर्यंत सुरु असल्याची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. पाणीपुरवठ्यात चार तासांनी उशिर झाल्याने सर्वच भागांमध्ये याचा परिणाम होणार आहे.

शहरात वारंवार पाईपलाईन फुटण्यासारख्या घटना घडत आहेत. मात्र यामुळे पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. तीन जूनला जायकवाडी जवळील पिंपळवाडी येथील चारशे मिलिमीटर व्यासाची पाईप लाईन फुटल्याची घटना घडली त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर ९ जुलैला चितेगाव टोल नाक्याजवळ बाराशे मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली.

ती दुरुस्ती करण्यासाठी तब्बल २२ तास लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले होते. त्यात आता पुन्हा एकदा मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास जायकवाडी येथील पंप हाऊस मध्ये ट्रिपिंग झाले. त्यानंतर पाणी उपसा करणारे सर्व पाच पंप बंद पडले आहेत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आलेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पाण्याच्या वेळेत केवळ चार तासांचा फरक पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!