Share

‘सेनाभवनाकडे कुणी वाकड्या नजरेनं पहिले तर आम्ही गप्प बसणार नाही’

Published On: 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजपने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.

या सगळ्या प्रकरणावर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर म्हणाले आहेत.

तर, सेनाभवन वर कुणी दगड धोंडे घेऊन येत असताना आम्ही गप्प बसणार नाही, सेनाभवनाकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहू नये. असा सज्जड दम देखील सदा सरवणकर यांनी भाजपला दिला आहे. ‘सेनाभवनावर कोणी आक्रमण करणार असेल, तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते चाल करुन सेना भवनाकडे येत आहेत, हे समजल्यानंतर आमच्या महिला तिथे गेल्या. त्यांना चप्पल काढून दाखवण्यात आली. त्यातून नंतर हा सर्व प्रकार घडला. आम्ही घरी सवस्थ झोपून राहू असं होणार नाही. सेनाभवनकडे वाकडी नजर करु नका, एवढीच अपेक्षा आहे. भाजपाने शांततेत आंदोलन केलं असतं, तर आमचा विरोध नव्हता. पण कोणी दगड, धोंडे घेऊन येणार असेल, तर स्वस्थ बसणार नाही’ असे देखील सदा सरवणकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!