Share

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतीये, कंगणा राणावतचा आरोप

Published On: 

मुंबई : मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,असा आरोप अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे.आपल्या ट्विटर हँटलवरुन तिने ट्विट करून आरोप केला आहे.अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन कंगणाने बॉलिवूडमधील काही लोकांबाबत आपली उघड भूमिका आहे होती.आपल्याला केंद्र सरकारने किंवा हरयाणा सरकारने सुरक्षा पुरवावी, असं म्हणत तिने मी मुंबई पोलिसांची सुरक्षा घेणार नाही अस जाहीर केले होते.

महाराष्ट्राबाहेरील सरकारकडे सुरक्षेची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊतांनी कंगनावर आखपाखड केली होती.सुशांतसिंगच्या प्रकरणानंतर कंपनाने बॉलिवूडमधील काही मोठ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांंविरोधात उघडपणे बोलायला सुरूवात केल्यानंतर तिने सुरक्षा मागितली होती.दरम्यान बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री ड्रग्जचं सेवन करत असल्याचा गौप्यस्फोट केला होता.त्यावरून आता वादंग सुरू झाले आहे.कंगणाने सुशांतसिंग प्रकरणावरुन सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर सुद्धा आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये ‘तनू वेड्स मनु’ ‘मणिकर्णीका’ ‘क्विन’ ‘क्रिश 3’ अशा अनेक चित्रपटांंमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामध्ये मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशी टीका केली होती. यानंतर नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.

दरम्यान, यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील कंगना राणावतचा चांगलाच समाचार घेतला असून मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ” 2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारची स्वतंत्र कोरोना नियमावली

शिवसेनेने धोका दिला ; काँग्रेस नेत्याचा घणाघात

विदर्भातील ‘या’ भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र…. वाचा काय लिहिले आहे ते

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!