🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामातील (IPL 2022) ३९वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs RR) यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स विजयी मार्गावर आहे. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त खेळाडू आहेत, त्यामुळे आज संध्याकाळी जबरदस्त सामना होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या मोसमात, बंगळुरू संघ ८ सामन्यांतून ५ विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स ७ सामन्यांतून ५ विजयांसह तिसर्या स्थानावर आहे. जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त कामगिरी करत आहे. या मोसमात त्याच्या फलंदाजीत आतापर्यंत ३ शतकी खेळी केल्या आहेत. त्याचवेळी गेल्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली होती. अशा परिस्थितीत ते या सामन्यात कसे पुनरागमन करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
491 runs. 7 games. 3 tons. 1 Jos Buttler. ????????#RoyalsFamily | #HallaBol | #TATAIPL2022 pic.twitter.com/wfihl4lq87
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 23, 2022
हेड टू हेड आकडेवारीमध्ये, बंगळुरूचा वरचष्मा आहे. बंगळुरूने १३ सामने जिंकले असून राजस्थान रॉयल्सने १० सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधले शेवटचे ५ सामने आरसीबीने जिंकले आहेत. आरसीबी संघाने या मोसमात एकदा राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीसाठी ५८४ धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक २६८ धावा केल्या आहेत. हर्षल पटेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीसाठी सध्याच्या गोलंदाजांमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
