चेन्नई : भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे. मात्र नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी या कार्याक्रमची घोषणा केली ज्यात त्यांनी सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सुरत, इंदोर, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर ह्या प्रमुख शहरात ही स्पर्धा खेळावली जाणार असून प्लेट ग्रुपचे आठ संघाचे सामने हे तामिळनाडूच्या विविध मैदानावर खेळवले जातील.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या ट्विटवर हँडेलवरुन २० जणांचा महाराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद २४ वर्षीय ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. ऋतुराज मागीलवर्षी इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामावेळी प्रकाशझोतात आला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून साखळी फेरीतील शेवटच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकं झळकावली होती. तसेच चेन्नईला सामने जिंकून दिले होते. तसेच तो नुकताच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही खेळला.
ऋतुराज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या संघात अनुभवी अष्टपैलू केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख अशा फलंदाजांचा समावेश आहे. तर सत्यजित बछाव, जगदीश झोपे, आशय पालकर, प्रदिप दधे, मनोज इंगेळे आणि मुकेश चौधरी असे गोलंदाज आहे. त्याचबरोबर निखील नाईक आणि विशांत मोरे हे यष्टीरक्षक संघात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- माथाडींच्या पीएफ घोटाळ्याची चौकशी करा, खा.जलील यांची संसदेत मागणी
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना रोहित शर्मा मैदानात पहाडासारखा उभा राहिला
- जागतिक रेडिओ दिन : रेडिओ आणि तरुणाईचं नातं
- अक्षय कुमारचा सूर्यवंशी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी करण्यास दिला नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

