नवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (mumbai indians) ने त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंड्या ब्रदर्सला (hardik pandya/ krunal pandya) मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव याला कायम ठेवण्यात आले आहे. मुंबईने तीन भारतीय आणि एका परदेशी खेळाडूला कायम ठेवले आहे. संघाचे मालक आकाश अंबानी (akash ambani) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना संघातील कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे.
कर्णधार रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना मुंबई संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये किरॉन पोलार्डचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माला 16 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. बुमराहला 12 कोटी आणि सूर्यकुमार यादवला 8 कोटी ठेवण्यात आले आहेत. पोलार्डला 6 कोटी रुपयांमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईने एकूण 42 कोटी रुपयांत एकूण चार खेळाडूंना आपल्या संघात ठेवले आहे.
याआधी पंड्या ब्रदर्सला संघातून सोडण्यात येणार असल्याची चर्चा होती.आता बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. या रिटेनशननंतर रोहित शर्मा म्हणाला की, ‘पुन्हा या टीमचा भाग बनून छान वाटत आहे. गेल्या काही वर्षांत संघासोबत खूप यश मिळाले आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे अभिमानास्पद आहे.
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. या संघाने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. गेल्या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाची कामगिरी खराब झाली होती. हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. यावेळी पुन्हा एकदा मुंबईचा संघ लिलावात काही बलाढ्य खेळाडूंसह बलाढ्य संघ उभारण्याचा प्रयत्न करेल. आता लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- कॉमेडीयन मुनावर फारुकीच्या पाठीशी कॉंग्रेस उभी
- देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती
- ‘२ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’


