Share

मलिंगा, पॅटिन्सनसह मुंबई इंडियन्सने ‘या’ ७ खेळाडूंना दिला डच्चू !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.

मुंबई इंडियन्स या संघाने तब्बल ५ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं असून २०२१ मधील आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी देखील संघ उत्सुक असल्याचं मॅनेजमेंटकडून सांगण्यात येत आहे.आज मुंबई इंडियन्सने सोडलेल्या (रिलीज केलेल्या) खेळाडूंची नवे जाहीर केली आहेत. यामध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट व गेली अनेक सत्र मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या श्रीलंकन खेळाडू लसिथ मलिंगाला देखील डच्चू देण्यात आला आहे.

संघाने कोणाकोणाला रिलीज केलं ?

लसिथ मलिंगा, मिशेल मॅकलंघन, नॅथन कुल्टर-नाईल, जेम्स पॅटिन्सन, रुथरफोर्ड, लेग स्पिनर प्रिन्स बलवंत राय, फास्ट बॉलर दिग्विजय देशमुख या खेळाडूंना येणाऱ्या मित्रांसाठी कायम न ठेवता लिलावामध्ये सोडण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जमधून बाहेर !

दरम्यान, यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. खुद्द हरभजन सिंगने याला दुजोरा दिला आहे. त्याने एक ट्विटकरून आपला चेन्नई संघासोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचे सांगितले आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!