Share

या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल; भाजप नेत्याची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दिली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या पोलीस कारवाई झालेली नाही आणि पक्षांतर्गत कारवाई पासून देखील मुंडे वाचले आहेत. यावर विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीलाही टार्गेट करत आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यामुळे भाजपकडून आंदोलने देखील करण्यात आली आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.  शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भातखळकर यांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप यांची तुलना केली आहे. शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी भूमिका घेते, असा आरोप देखील केला आहे.

‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!