मुंबई : अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसापुर्वी मुंबई पोलिसांनी उद्योजक राज कुंद्राला अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ बनवून वेबसाइटवर अपलोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी राजने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याच्या या अर्जावर सोमवारी २६ जुलै रोजी सुणावणी होणार आहे. २० जुलै रोजी अटक झालेल्या राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला शुक्रवारी न्यायलयात पुन्हा हजर करण्यात आले. तेव्हा पुन्हा २७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
न्यायालयाच्या या आदेशानंतर राज कुंद्राचे वकीव सुभाष जाधव यांनी त्याला झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. असे सांगितले होते. राजने कोणत्याही प्रकराचे अश्लिल व्हिडीओ बनवले नसल्याचे त्याचे वकील जाधव यांनी सांगितले. राजने बनवलेले व्हिडीओ हे पोर्न कॅटॅगरीत येत नाही असेही ते म्हणाले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती पुरवे लागल्यानंतर त्यांनी राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्राच्या अटकेने उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अमरावतीत भाजपने कृषीमंत्री दादा भुसे यांना दाखविले काळे झेंडे
- चंद्रपूर शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, आ. जोगरेवारांनी मनपा आयुक्तांना दिल्या ‘या’ सूचना
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थितीमुळे तब्बल 22 हजार कुटुंबांसह 24 हजार जनावरांचेही करण्यात आले स्थलांतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

