Share

अमरावतीत भाजपने कृषीमंत्री दादा भुसे यांना दाखविले काळे झेंडे

Published On: 

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. चार दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ,भातकुली, चांदूर बाजार या परिसराला अतिवृष्टीने चांगलेच झोडपले. यात भातकुली तालुक्यातील रामा साहूर, टाकरखेडा संभु या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

दरम्यान, आज  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा भाजप कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखविले. कृषी मंत्री दादा भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमरावती-दर्यापूर मार्गावर बोरखेडीजवळ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून कृषी मंत्र्यांचा निषेधही केला.

भातकुली तालुक्यातही शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी भातकुलीमध्येही पाहणी करायला हवी होती आणि आमच्या समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या असे आंदोलक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कृषी मंत्री भातकुलीला न थांबल्याने त्यांना काळे झेंडे दाखविल्याचे भातकुलीचे भाजप तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!