🕒 1 min read
मुंबई:- मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आवाहन असणार आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.
मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हा खांदेपालट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. तर समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ.अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली आहे.
दरम्यान, भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरुद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
महत्वाच्या बातम्या
- तकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश पाठोपाठ ‘या’ राज्यातील शाळा देखील होणार सुरु
- कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा राहुल गांधी यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
