Share

मुंबईहून चोरलेली बस पैठणमध्ये आणली आणि…

Published On: 

औरंगाबाद: अनेक वस्तूंच्या चोरी झालेल्या आपण ऐकलं आहे, कधी दुचाकी तर कधी चारचाकी चोरीला गेली अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो. पण इथे तर चक्क या चोरट्यांनी बस चोरून आणली आहे. एवढ्यावरच हे थांबले नाहीत, त्या बसची मोडतोड करून ती भंगारमध्ये घालण्याचा यांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी बसची मोडतोड करायला सुरुवातही केली होती. तेवढ्यात पोलिसांनी या बहाद्दरांना ताब्यात घेतले.

पैठण तालुक्यातील आखादवाडा येथील ही घटना आहे. आखादवाडा शिवारात जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला बाभळीच्या झाडाच्या आडोशाला ही बस उभी केली होती. मुंबई वेस्ट हद्दीमधील ही बस (एमएच ०४ जेयू ४२५७) चोरट्यांनी ही बस बोरीवली मुंबई वेस्ट येथून चोरून आणून ती थेट पैठणपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आखादवाडा शिवारात उभी केली. तिथे हे चोरटे बसची तोडफोड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली आणि या चोरट्यांना रंगेहाथ पकडले. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पोलिसांना बघून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एकाला पोलिसांनी लगेच पकडले तर दुसऱ्याला दोन किलोमीटर पाठलाग करून पकडले. त्यातील एक चोर मुकबधिर असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. चोरी करून आणलेल्या बसची पोलिसांनी चौकशी केली असता, त्या बसची किंमत १९ लाख रुपयांची असल्याचे समजले तसेच ती बस मुंबई वेस्ट येथील असून तिथे बस चोरीचा गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती मिळाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!