🕒 1 min read
मुंबई: बनारस हिंदू विद्यापीठामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याच वृत्त माध्यमांमध्ये आले होते.
रिलायन्स फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून नीता अंबानी महिला सशक्तीकरणासाठी बरेच काम करतात. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच महिला सशक्तीकरणाशी निगडीत शैक्षणिक आणि संशोधन काम या केंद्रामध्ये सुरू असते. हे केंद्र जवळपास 20 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले असून इथे मानद प्राध्यापकाच्या 3 जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर अंबानी यांना प्राध्यापक नियुक्त केल्यास महिलांना त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळू शकेल. अस मत केंद्राचे प्रमुख असलेल्या कौशल किशोर मिश्रा यांनी व्यक्त केल आहे.
मात्र या प्रस्तावाला काही विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. मंगळवारी कुलगुरु राकेश भटनागर यांच्या निवासस्थानाबाहेर 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या नीता अंबानी यांना मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करून विद्यापीठ चुकीचा पायंडा पाडत असल्याचं या विद्यार्थी संघटनांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच्या बातम्या या चुकीच्या असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं करण्यात आला आहे. निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने खुलासा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- डुकाटीच्या दोन शानदार बाईक्स ग्राहकांच्या भेटीला जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
