Share

धोनीच्या बदलत्या लूकची चर्चा, नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

Published On: 

नागपूर : नागपूर शहर पोलिसांनी नुकतेच एक भन्नाट ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा आज सर्व  शहरभर झाली आहे. नागपूर पोलिसांनी भारतीय माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीच्या अनेक प्रकारच्या लूकमधील चार फोटो ट्विट करत.  नागरिकांनी सुद्धा अश्याच प्रकारे आपला बँक पासवर्ड बदलत रहावा असा सल्ला दिला आहे.

नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नवनवीन लूकमधील विविध फोटो ट्विट करत नेहमी आपला पासवर्ड बदलत राहा असा सल्ला दिला आहे. ज्या प्रमाणे माही आपला लूक सातत्याने बदलत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपला पासवर्ड बदलत रहा. जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही असं सुचवण्यात आले आहे.

नेटकाऱ्यांना देखील हे भन्नाट ट्विट आवडले असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे आमिष आणि भीती दाखवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. आणि त्यांची फसवणूक करतात. अशा फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

गुन्हेगार विशेषतः जेष्ठ नागरिक आणि बँक व्यवहारांच्या संदर्भात अज्ञान असलेल्या लोकांची फसवणूक सहजरीत्या करताना दिसून आले आहे. अशा लोकांनी सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी नागपूर शहर पोलीस सातत्याने विविध प्रकारच्या ट्विटच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!