मुंबई : एक काळ असा होता की बॉलीवूडमध्ये चित्रपट बनवण्याची संपूर्ण जबाबदारी अभिनेत्याच्या खांद्यावर असायची पण आजच्या काळात चित्रपट जगतात सर्व काही बदलले आहे. आजच्या काळात अनेक बॉलिवूड अभिनेत्री हॉलिवूड अभिनेत्रींना स्पर्धा देताना दिसतात. मग ती दीपिका पदुकोण असो की आलिया भट्ट. प्रत्येक अभिनेत्री तिच्या चित्रपटांमध्ये अशी व्यक्तिरेखा साकारते, जी चाहत्यांच्या हृदयाला भिडते. एवढेच नाही तर काही अभिनेत्रींनी त्यांचे चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्री आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत
गंगुबाई काठियावाडी : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो येताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात आलियाने सेक्स वर्कर गंगूबाईची भूमिका साकारली असून आलियाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श केला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
वीरे दी वेडिंग : ‘वीरे दी वेडिंग’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया दिसल्या होत्या. या चार मित्रांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने जगभरात 138 कोटींहून अधिक कमाई केली होती.
तनु वेड्स मनु रिटर्न्स : कंगना राणौत ही एक बॉलीवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या चित्रपटांमध्ये हिरोईन आणि हिरो देखील आहे. कंगनाने तिच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटात कमाल केली. या चित्रपटात अभिनेत्रीने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींहून अधिक कमाई केली होती
पिंक : तापसी पन्नूचा ‘पिंक’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट महिला सक्षमीकरणावर होता. या चित्रपटाच्या कथेसोबतच संवादही प्रेक्षकांच्या मनाला भिडले. या चित्रपटाने 155 कोटींहून अधिक कमाई केली होती.
स्त्री : श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटात कॉमेडी आणि हॉररची सरमिसळ होती. या चित्रपटात श्रद्धासोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या पण चित्रपटाची संपूर्ण कथा श्रद्धावर आधारित होती. या चित्रपटाने जवळपास 130 कोटींचा व्यवसाय केला होता
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

