🕒 1 min read
मुंबई : अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आता, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याला पुत्ररत्न झालं आहे. त्यामुळे देशातील सरावात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे आजोबा झाले आहेत.
आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिने आज सकाळी 11 वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका यांचं 9 मार्च 2019 रोजी लग्न झालं होतं. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. उद्योग क्षेत्रात सद्या सर्वात यशस्वी उदोगपतींमध्ये मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचं नाव घेतलं जातं.
जिओच्या स्थापनेनंतर त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. तर, यंदा २०२० च्या आयपीएलच्या १३व्य हानगमात देखील अंबानींच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता. आता, त्यांच्या आनंदात द्विगुणित वाढ झाली आहे. अंबानी कुटुंबाच्या वतीने एका प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, ‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे ते खूप आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहर घेऊन आला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- शिर्डीतील ड्रेसकोडचा वाद चिघळण्याची शक्यता; तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- केवळ मोबाईलवरील ऍप्सवर बंदी घालायची, फुटकळ निर्बंध लादायचे आणि…; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
- शरद पवार होणार पंतप्रधान? लवकरच युपीएमधील मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत!
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- ‘दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्याव्यात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
