पुणे : ‘वशाटोत्सव म्हणजे काही फक्त मासाहरी मेजवानीचा कार्यक्रम नसून तो वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम आहे, हे आपण सर्वजण जाणताच. राज्यभरातील बहुजन विचारधारेला मानणाऱ्या तरुणांना एकत्र आणून, त्यांच्या वैचारिक विश्वाला विधायक मार्गाने समृद्ध करण्याचं काम, आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आलो आहोत’, असे म्हणत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ‘वशाटोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शनिवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व ठाकरे सरकारमधील बडे मंत्री उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राज्यभर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध लावले असताना पुण्यात मात्र, वशाटोत्सव थाटात साजरा होणार असल्याने, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई संतप्त झाल्या आहेत.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर निर्बंध, अनेक ठिकाणी जमावबंदी आणि संचार बंदी लागू करण्याचे आदेश आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात एकही नेता त्यांच्या घरी सांत्वनाला जात नाही. परंतु हे सर्व नियम सर्वसामान्यांना लागू आहेत का?,’ असा सावल तृप्ती देसाई यांनी खडा केला आहे.
‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले आहे. आणि असं समजतंय की, या कार्यक्रमाला पवार साहेब, संजय राऊतसाहेब, धनंजय मुंडे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मग या उत्सवाला परवानगी कुणी दिली. या उत्सवामध्ये सुद्धा १०० जणांनी सहभागी व्हायचे, असे निर्बंध का नाही लादले?
जसं दिल्लीत तबलिगी प्रकरण गाजले होते त्याची पुनरावृत्ती या गर्दीतून झाली तर मग कोण जबाबदार? महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना वेगळे नियम लागू आहेत का आणि त्यांना सर्व सूट आहे का? याचे उत्तर या सर्व नेत्यांनी द्यावे ?’, अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी उद्या होऊ घातलेल्या वशाटोत्सव कार्यक्रमाच्या आयोजकांवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बालेकिल्ले अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांची व्यूहरचना
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- पोलिस कर्मचाऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, सोशल मिडियावर ऑडीओ क्लिप व्हायरल
- सातारा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल केला फिर्यादींना परत
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

