Share

जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठीच अधिवेशनाला कात्री लावण्याचा सरकार प्रयत्न करतंय का ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे- राज्यात करोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपतं घेण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामागे काही राजकीय षड्यंत्र तर नाही ना अशी कुजबुज सुरु झाली आहे. ठाकरे सरकार जनतेचे अनेक प्रश्न सोडवू शकले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे त्यामुळेच प्रश्नांपासून पळ काढण्यासाठीच सरकारचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

धनंजय मुंडे प्रकरण,संजय राठोड प्रकरण,राज्यातील कायदा सुव्यवस्था,शेतकऱ्यांचे प्रश्न,वीजबिलाचा मुद्दा,मराठा आरक्षण,धनगर आरक्षण यासारख्या विविध मुद्यांवर चर्चा होऊन हे प्रश्न मार्गी लागावेत अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे मात्र सरकारची या मुद्द्यावर अडचण होऊ शकते अशी शक्यता असल्याने सरकार पळपुटेपणा करत असल्याचे देखील काही जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

मागे झालेल्या विविध निवडणुका असोत किंवा नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असोत सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले.पण हे सर्व करताना कुठेही कोरोनाचा धोका सरकारला दिसला नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन व्यवस्थित पार पडू शकते मग महाराष्टात अधिवेशनाला कात्री का लावली जात आहे असा देखील सवाल उपस्थित होऊ शकतो. सध्या देखील सर्व पक्षांचे मेळावे,सभा,आंदोलने,बैठका सुरु आहेत मग कोरोनाचे कारण देवून जर अधिवेशनाचा कालावधी कमी करून नेमके सरकारला काय सिद्ध करायचे आहे हे मोठे कोडे आहे.

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचं काही आकडेवारीवरून समोर येत आहे. सरकारनं लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच कोरोना संक्रमण पुन्हा वाढलं असल्याचं सांगितलं जातं आहे. पण राज्यातील कोरोना वाढीला फक्त सर्वसामान्यच नाही तर सर्वपक्षीय राजकारणी जबाबदार नाहीत का असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!