🕒 1 min read
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जागेवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा नेता विराजमान होणार यावरून अनेक कयास बांधले जात आहेत. राज्यात सरकार स्थापन करताना हे पद कॉंग्रेसच्या पदरात पडले होते.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर हे पद आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना खुलं झाल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर पवारांनी काँग्रेस याबाबत निर्णय घेईल असा खुलासा केला होता. अद्यापही अध्यक्षपद हे रिक्त असून विधानसभेच्या येत्या अधिवेशनाच्या आत नव्या अध्यक्षांची निवड गरजेची आहे.
देवेंद्र फडणवीसांची टीका –
विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे तरी हे सरकार का घाबरत आहे ?’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘आपल्याच आमदारांना एवढं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहतोय’ असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला होता. ‘त्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे काही झालं तर आपलं सरकार पडेल का, अध्यक्ष पडेल का ? अशी भीती त्यांना वाटत आहे. चंगलंय , सरकारवर अंकुश राहील व त्यामुळे सत्ताधारी पक्षांतील आमदारांचा भलं होईल,’ अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
अजित पवारांचं प्रत्युत्तर –
‘महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचं पाठबळ आहे. गुप्तमतदान असलं तरी गरजेपेक्षा अधिक संख्याबळ आहे. याआधी सरकार स्थापन झाल्यानंतर देखील विरोधकांनी सरकार तीन महिन्यांनी पडेल, सहा महिन्यांनी पडेल असं भाष्य केलं होतं. मात्र, आजही सरकार स्थिर आहे. वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सारख्या नेत्यांचं मार्गदर्शन देखील मिळत असून सरकार घाबरण्याचा प्रश्नच नाही,’ असं भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- सातारा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल केला फिर्यादींना परत
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

