नांदेड :महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे घर्षण झाल्याने काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला. वारंवार विनंती करून सुद्धा महावितरणने या विद्युत तारांचा बंदोबस्त न केल्याने, शेवटी ही दुर्घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.
रामदास तांडा येथील मुक्ताबाई रामदास पवार यांच्या दीड एकर शेतातील ऊस जळून खाक झाला. यात जवळपास पावणेपाच लाखाचे नुकसान झाले. सोनखेड पोलिस ठाण्यात जळीत प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. मुक्ताबाई पवार यांच्या शेतावर एक जवळपास दीड एकर ऊसाची लागवड करण्यात आली होती. महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे घर्षण झाल्याने काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला. जवळपास दीडशे टन ऊस त्याची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये इतके नुकसान झाले आहे.
महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारा उंचावरुन घेण्यात यावे अशी विनंती यापूर्वी श्री पवार यांनी महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणने ही त्यांच्या विनंतीला गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार घडला. वेळीच उंचावरुन तार घेतली असती तर हा प्रकार घडला नसता, या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते रवींद्र मंकणी याच्या मुलाला पुणे पोलिसांची अटक; गोपनीय डेटा प्रकरण
- अंतिम सामना गमावल्यानंतर कुस्तीपटू बबिता फोगटच्या बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

