Share

चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर आज होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. टी-२० मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मालिकेत सध्या २-१ च्या फरकाने इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे.

आतापर्यंत मालिकेत भारताच्या संघाला डावाची भक्कम सुरुवात देण्यात सलामीवीर फलंदाज अपयशी ठरले आहेत. तिन्ही सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल हा सपशेल अपयशी ठरला आहे. मात्र कर्णधार कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात कायम ठेवले आहे. तेव्हा आज होणाऱ्या सामन्यात राहुलच्या कामगीरीवर सर्वांचे लक्ष लागलेले आसेल.आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ सपशेल अपयशी ठरला. भारतीय संघात कर्णधार विराट कोहली चागंल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र बाकीचे फलंदाज त्याला साथ देत नसल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभा करायला आडचणी येत आहे. पण जर भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना या चार गोष्टी कराव्याच लागतील.

भारतीय संघाला आतापर्यंत चांगली सुरुवात मिळू शकलेली नाही. कारण लोकेश राहुल हा गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तीन सामन्यांमध्ये मिळून त्याला फक्त एकच धाव करता आली आहे. त्याचबरोबर गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याला वगळले तर ते भारतीय संघाच्या पथ्यावर पडू शकते.

भारतीय संघाला या मालिकेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा चांगला सामना करता आलेला पाहायला मिळत नाही. कारण इंग्लंडचा मार्क वुड, जोफ्रा आर्चर यांनी भारतीय संघाला एकामागून एक धक्के दिले आहेत. गेल्या सामन्यातही मार्क वुडने भेदक गोलंदाजी करत तीन फलंदाज माघारी धाडले होते. त्यामुळे आता भारताला जर चांगली सुरुवात करायची असेल तर त्यासाठी वेगवान गोलंदाजीचा चांगला सामना त्यांना करावा लागेल.

भारतीय संघामध्ये नवव्या क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी दिसत आहे. पण त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी होत असल्याचे पाहायला मिळत नाही. कारण हार्दिक पंड्याचा वापर पाचवा गोलंदाज म्हणून केला जातो. त्यामुळे भारतीय संघाला जर चौथा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी पाच गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवे. यामध्ये दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर एखाद्या गोलंदाजाला जर जास्त धावा जात असतील तर त्याची उर्वरीत षटके हार्दिक पंड्या टाकू शकतो. भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण बदलावे लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!