Share

अभिनेते रवींद्र मंकणी याच्या मुलाला पुणे पोलिसांची अटक; गोपनीय डेटा प्रकरण

Published On: 

पुणे : पुणे सायबर क्राइमने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहण मंकणी याला अटक केली आहे. बॅंकांच्या खातेदारांचा गोपनीय डेटा चोरी आणि विक्री प्रकरणी रोहण अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह एकूण दहा जणांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. तब्बल २२५ कोटी रुपये वाचवणाऱ्या पुणे सायबर विभागाचे हो मोठे यश मानले जात आहे.

पुण्यात सहकारनगर भागात राहणारा रोहन मंकणी हा पुणे शहराचा भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आहे. पुणे सायबर पोलिसांनी रोहनला २५ लाखांची लाच घेताना अटक केली. त्याच्यासोबत अटक केलेल्या नऊ जणांची सध्या पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. बँक खातेदारांचा गोपनीय डेटा चोरी करुन विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यात रोहन सामिल असल्याची माहिती समोर आली आहे.

वडील रविंद्र मंकणी प्रमाणे रोहणचा अभिनय क्षेत्रातही नाव कमावण्याचा प्रयत्न सुरु आहे. याव्यतिरीक्त रोहन राजकीय विश्लेषक आणि सल्लागारही म्हणूनही कार्यरत होता. तसेच रोहण हा फूड आणि वाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी तो खास ओळखला जातो. रोहनचे वडीस रवींद्र मंकणी यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटात केले आहे. त्यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या आहेत. तर निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!