Share

नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : सतत नशिबी येणारा दुष्काळ, नापिकी व बँकेचे कर्ज आणि कोरोनामुळे हाताला काम नसल्याने हतबल झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनेनंतर गावात दुःखाचे वातावरण पसरले होते. वारंवार होणाऱ्या आत्महत्या कधी बंद होणार असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण आणि लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

नांदेड तालुक्यातील तुप्पा येथील शेतकरी रामराव माणिक टिपरसे यांच्या शेतात मागील काही दिवसापासून सततची नापिकी होत होती. तसेच त्यांच्यावर बँकेचे व काही खासगी सावकारांचे कर्ज होते. त्या कर्जाची परतफेड होत नसल्याने त्यांनी आपल्या शेतात जाऊन ९ मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विष प्राशन केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नातेवाईकांनी त्यांना तात्काळ नांदेडच्या विष्णुपूरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष रामराव टीपरसे यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील शेतकरी शेख खाजा शेख गफार यानेही नापिकीला व कोरोनामुळे हाताला कामधंदा मिळत नसल्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी रात्री १० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!