Share

महावितरणने तयार केला विलगीकरण कक्ष! कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर होणार उपचार

Published On: 

औरंगाबाद : महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी १० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या हस्ते या कक्षाचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले.

त्यामुळे आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी कुठेही पायपीट करण्याची गरज नसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या व राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी हर्सूल येथील प्रशिक्षण केंद्रात हा कक्ष सुरू केला आहे.

या वेळी प्रभारी मुख्य अभियंता बिभीषण निर्मळ, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता एकनाथ वाघ, सतीश खाकसे, निधी गौतम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार, विनय घनबहादूर, अनिल कराळे, उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने, सहायक अभियंता श्याम मोरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!