Share

“मिस्टर फडणवीस कट-कारस्थानं करून राज्य चालत नाही” ; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापणदिन आहे. या निमित्ताने मुंबईत आज कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेने नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”मी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते, त्यावर भाजपने माझ्यावर टीका केली होती. श्रीलंकेत जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा भारतातील परिस्थिती अशीच व्हायला वेळ लागणार नाही, असं मी म्हणालो होतो,” या वक्तव्याची संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली.

“श्रीलंकेतील घटनेच्या एका महिन्याच्या आत आज देशातील परिस्थिती तशीच झाली आहे. आंदोलनकारी तरुणांना रोखण्यासाठी सैन्य मागवावे लागत आहे. बिहारमध्ये तरुणांना रोखण्यासाठी सैन्य आले, याला राज्य चालणे म्हणत नाहीत. राज्य चालवणे पाहायचे असेल, तर मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही. राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावे लागेल. ती क्षमता शिवसेनेकडे आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

‘शिवसेनेचा ५६ वर्षांचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता इतिहास आहे. अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचे काम ५६ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी केले, आजही न्यायाच्या लढाईत सर्वात पुढे शिवसेनाच आहे. शिवेसनेच्या अंगावर किरोकोळ लोक खूप सोडले, राणा-बाणा-काणा. पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरोधात लढण्याचा बाणा, हा सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभा आहे. आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. केंद्रीय यंत्रणेची मस्ती आम्हाला दाखवता. सीबीआय, इडी, इनकम टॅक्स मागे लावले. पण, आम्ही कोणाला घाबरत नाही. अंगावर आलात, तर फक्त शिंगावरच घेणार नाही, तर तुडवले जाल, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!