Share

‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी रान पेटवले होते. भारतीय जनता पक्षाने एमपीएससीच्या रखडलेल्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते.

यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी विधानसभेत एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केल्याचे पवार यांनी विधिमंडळात सांगितले.

परंतू आता ३१ जुलै तारीख उलटल्यानंतरही राज्य सरकारने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप भाजपने केलाय. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अजित पवारांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत सवाल विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला काय? दादा, क्या हुआ तेरा वादा? असा चिमटा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?
दि.५ जुलै रोजी विधानसभेत पवार म्हणाले की, ‘मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली आहे. स्वप्निलने असे करायला नको होते, अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण, तो नाउमेद झाला असेल, त्याचा भ्रमनिरास झाला असेल. पण, काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!