Share

‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज रविवार, १ ऑगस्टपासून खिशावर आणि आयुष्यावर परिणाम करणारे बदल लागू झाले आहेत. आता बँकेचे व्यवहार रविवार आणि सुटीच्या दिवशीही होऊ शकतील. वेतन, निवृत्तिवेतनदेखील सुटीच्या दिवशी मिळेल. तर एटीएम इंटरचेंज (दुसऱ्या एखाद्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे) शुल्क १५ रुपयांऐवजी १७ रुपये होतील. गैरआर्थिक व्यवहारही शुल्क पाचऐवजी सहा रुपये होईल.

या दरवाढीवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत मोदींनी स्वत:चे पैसेही महाग केलेत. भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवले असे सावंत म्हणालेत.

सावंत यांनी ट्विट केले आहे की, आजपासून एटीएम सुविधा व डेबिट कार्डच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. अच्छे दिनमध्ये स्वतःचे पैसे महाग झाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा मोदीजी आग्रह धरतच होते. भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे किंवा बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं! मोदी है तो मुमकीन है असे म्हणत भाजप सरकारला टोला लगावला आहे.

दरम्यान, १ ऑगस्टपासून एटीएमचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ९ वर्षांनंतर इंटरचेंज फी वाढवली आहे. एटीएमवरील खर्च आणि भविष्यातील विस्तार योजना लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आली आहे. तर नॉन -फाइनेन्शियल शुल्कही ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टिम सातही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुटीच्या दिवशीही बँक खात्यातून कर्ज हप्त्याची कपात होईल. तसेच आयसीआयसीआय बँकेचेही पैसे काढणे, जमा करणे आणि चेक बुक शुल्कासह अनेक नियमांत बदल होणार आहेत. आता चेकद्वारे महिन्यात फक्त चार वेळा मोफत देवाण-घेवाण करता येईल. यापेक्षा जास्त वेळा पैसे जमा किंवा काढल्यास प्रत्येक वेळी १५० रुपये शुल्क द्यावे लागेल. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची डोअरस्टेप (घरपोच) बँकिंग सुविधेसाठीही २० रुपये व जीएसटी द्यावा लागेल. आतापर्यंत ही सुविधा मोफत होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!